- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG | सुप्रिया सुळेंबद्दल फेसबुकवर अपशब्द, तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चोप
LIVE BLOG | सुप्रिया सुळेंबद्दल फेसबुकवर अपशब्द, तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चोप
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर अपशब्द वापरणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चोप
ABP News Bureau
Last Updated:
14 May 2019 11:15 PM
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर अपशब्द वापरणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चोप
'सीएसएमटी पुल कमकुवत झाल्याची माहिती असुनही बेजबाबदारपणे पुलाच्या वापराला परवानगी दिली'. ऑडिटर नीरज देसाईच्या जामीन अर्जाला विरोध करत मुंबई पोलीसांचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर, पुढील सुनावणी २० मेपर्यंत तहकूब
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 जूनला निवडणूक, शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त जागा, 28 मेपर्यंत अर्ज भरण्याची तारीख
सोलापूर - बार्शीमध्ये बाईकवर जाताना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एकाची हत्या, बार्शीतील बाळेश्वर नाका भागातील प्रकार, 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा,
अमित शाहच्या रोड शोनंतर जाळपोळ,
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज
राज्यात भाजपची लोकसभानिहाय निवडणूक आढावा बैठक 21 मे रोजी होणार, मुंबईत वसंत स्मृती कार्यालयात बैठकीचं नियोजन
पुणे : गर्भलिंग निदान प्रकरणी 2011 मध्ये स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडलेल्या डॉक्टर नीना मथराणी यांना तीन वर्षाची सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, पुणे सत्र न्यायालयाची शिक्षा
#BREAKING
ईव्हीएमबाबत शंका नाही : अजित पवार,
ईव्हीएमबाबत पवारांच्या घरातील लोकांमध्ये संभ्रम,
शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना ईव्हीएमबाबत शंका तर अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास
यंदाचा मान्सून लांबण्याचा 'स्कायमेट'चा अंदाज, केरळमध्ये चार जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता, सरासरीच्या 93 टक्के पावसाचा अंदाज
नागपूरच्या एम्प्रेस मॉलवर जप्तीची कारवाई,
483 कोटींचा मॉल ईडीकडून जप्त,
तायल ग्रुपविरोधात कारवाई
दुष्काळामुळे भाजपची निवडणूक आढावा बैठक लांबणीवर, दुष्काळ आणि सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे पक्षाचा सावध पवित्रा, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणार होती निवडणूक आढावा बैठक
कोलकाता : ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचं प्रकरण, भाजप कार्यकर्ती प्रियंका शर्माच्या सुटकेच्या आदेशात सुप्रीम कोर्टाकडून दुरुस्ती, 'अट' हा शब्द हटवला, सुटका झाल्यावर माफी मागणार
कोलकाता : ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचं प्रकरण, भाजप कार्यकर्ती प्रियंका शर्माला जामीन मंजूर, मात्र माफी मागण्याची अट, पश्चिम बंगाल सरकारने तिला अटक करून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती
मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब. मुंबई सत्र न्यायालयातील पुढील सुनावणीत अण्णा हजारेंना सरकारी साक्षीदार म्हणून बोलावण्याची शक्यता
बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीचा खून केल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. डोक्यात दगड घालून
ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19 वर्ष) या मुलीचा आईनेच खून केला. यानंतर आरोपी आई संजीवनी हरीदास बोभाटे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली.
बारामतीच्या प्रगतीनगर भागातील ही घटना आहे.
बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीचा खून केल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. डोक्यात दगड घालून
ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19 वर्ष) या मुलीचा आईनेच खून केला. यानंतर आरोपी आई संजीवनी हरीदास बोभाटे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली.
बारामतीच्या प्रगतीनगर भागातील ही घटना आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक गोरख जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. गोरख जाधव हे केडीएमसीच्या आटाळी, प्रभाग 7 मधील शिवसेनेच नगरसेवक आहेत. गटाराच्या कामात ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी एसीबीकडून जाधव यांच्या घराती झाडाझडती सुरु आहे.
कोकण रेल्वे विस्कळीत, विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रत्नागिरीच्या भोके गावाजवळ रेल्वे ट्रॅकवरून घसरले, मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना ब्रेक, अर्धा तासात मार्ग पुन्हा सुरु होईल, रेल्वे प्रशासनाची माहिती
मुंबई : हार्बर रेल्वेवर स्टंट दरवाज्यात उभे राहून स्टंट करणाऱ्या दोन मुलांना अटक, वडाळा लोहमार्ग पोलिसांची कारवाई, दोनही मुलं अल्पवयीन असून त्यांच्यावर कलम 336,34 अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली आहे
पुणे : कोयता हातात घेऊन टिकटॉक व्हिडीओ बनवणं तरुणाच्या अंगलट, दीपक दाखले तरुणाला अटक, परिसरात दहशत पसरवण्यासाठी हेतून तयार केला होता व्हिडीओ
पुणे : कोयता हातात घेऊन टिकटॉक व्हिडीओ बनवणं तरुणाच्या अंगलट, दीपक दाखले तरुणाला अटक, परिसरात दहशत पसरवण्यासाठी हेतून तयार केला होता व्हिडीओ
मुंबई : दादर, वसई रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद, दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील तर वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक 6 आणि 7 वरील मध्यवर्ती पूल 29 मे पर्यंत बंद
जेट एअरवेजचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य आर्थिक अधिकारी अमित अग्रवाल यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण
पुणे : छोटा राजन टोळीतील सराईत गुंड अजय चक्रनारायण आणि पुण्यातील गजा मारणे टोळीतील गुंड जमीर शेख या दोघांना कोथरुड परिसरातून अटक, दोघांकडून दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, राष्ट्रवादीकडून आमदारकीची ऑफर असल्याची राजकीय गोटात चर्चा
कोल्हापूर : मदन नाईक हत्या प्रकरण, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विशेष चौकशी पथकाची स्थापना
मुंबई : कफ परेड इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरुन उडी मारुन 51 वर्षीय जीएसटी सुप्रीटेन्डंटची आत्महत्या, पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद, पुढील तपास सुरु
औरंगाबाद : चिकलठाणा परिसरात
गॅरेजला आग, हिनानगर गॅस पेट्रोल पंपासमोर 14 ते 20 वाहने जळून खाक
औरंगाबाद : चिकलठाणा परिसरात
गॅरेजला आग, हिनानगर गॅस पेट्रोल पंपासमोर 14 ते 20 वाहने जळून खाक
नाशिक : मालेगाव शहरातील नवीन बस स्थानकावर उभ्या असलेल्या सटाणा बस डेपोच्या बसला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, कॉलेज निवडीसाठी आणखी 8 दिवस मिळणार
2.लोकसभेत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरू, रणनिती आखण्यासाठी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा
3. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी, कमल हसन यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांचा जोरदार पलटवार
4. नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती लागू, पहिल्याच दिवशी तेराशे जणांकडून 5 लाखांचा दंड, तर हेल्मेटसक्तीमुळे पुण्यात अपघाती मृत्यूचं प्रमाण घटलं
5. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या कारकिर्दीवर अनोखं संग्रहालय, स्वत: पवारांनीच एबीपी माझाला घडवली संग्रहालयाची सफर
6. आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचं चाहत्यांकडून जोरदार स्वागत, ढोलताशांच्या गजरात अंबानींच्या अँटिलियापासून मरिन ड्राईव्हपर्यंत जंगी मिरवणूक