LIVE BLOG : ठाण्यात 17 वर्षीय तरुणाची 32व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

प्रथमेश राबोडीतील सरस्वती शाळेत अकरावी इयत्तेत शिकत होता. हा तरुण त्याच्या मित्राला भेटण्यासाठी संबंधित इमारतीमध्ये आला होता.

ABP News Bureau Last Updated: 09 Apr 2019 11:40 PM

Background

1.  पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, विदर्भात मॅरेथॉन सभा तर औसात मोदी आणि ठाकरे एकत्र2. साठीनंतर शेतकरी, दुकानदारांना पेन्शन आणि बळीराजाला सरसकट 6 हजाराचं अनुदान , लोकसभेसाठी भाजपचं 75...More

ठाण्यात इमारतीच्या 32व्या मजल्यावरून उडी मारुन 17 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. प्रथमेश महेश परब असं मृत तरुणाचं असून ते कळव्यातील मनिषानगरमध्ये राहत होता. प्रथमेश राबोडीतील सरस्वती शाळेत अकरावी इयत्तेत शिकत होता. हा तरुण त्याच्या मित्राला भेटण्यासाठी संबंधित इमारतीमध्ये आला होता. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलिसांनी इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्याच्याकडील मोबाईलद्वारे तपास सुरु केला आहे.