LIVE BLOG : न्यूझीलंडमधील मशीदीत झालेल्या गोळीबारात 7 भारतीयांचा मृत्यू

उद्या शिवसेना-भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये होणार आहे.

ABP News Bureau Last Updated: 17 Mar 2019 12:06 AM
न्यूझीलंडमधील मशीदीत झालेल्या गोळीबारात 7 भारतीयांचा मृत्यू
नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांनी आज राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास सुजय विखे यांनी अण्णांसोबत चर्चा केली. अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण राळेगण सिद्धी येथे आल्याचे सांगून अण्णांचा आशीर्वाद घेतल्याचे विखे यांनी सांगितले.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अथवा ज्योतिष असल्याचे सांगून वृद्ध व्यक्तींना हेरून त्यांच्याशी बतावणी करून त्यांना लुटणाऱ्या दोन अट्टल भामट्याने नवघर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. आरिफ मोहम्मद शेख, फरियाद अमरुद्दीन शेख अशी त्यांची नावे असून ते मुंब्रा येथील रहाणारे आहेत.
सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला खडबडून जाग आली आहे. कारण आता मुंबईतील सर्व पुलांचे नव्यानं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या नोटीसा मुंबई महापालिकेनं दिल्यात.
सि.व्ही.कंद कन्सलटंट या कंपनीने मुंबई शहर आणि उपनगरातील 157 पुलांचं तर स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सलटंट कंपनीने केलेल्या उपनगरातील 66 पुलांचं ऑडीट केलं होतं. मात्र आता पुन्हा नव्यानं ऑडीट करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्यात.
सीएसएमटी पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये बेपर्वाई झाल्याचं उघड झाल्यानंतर महापालिकेला जाग आलीये.
दादर स्टेशनवरील बीएमसीचा पादचारी पुलाची तात्काळ होणार दुरुस्ती, पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 ला जोडणारा जिना राहणार बंद
लोकसभा निवडणूक : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद आणि उत्तर मध्य मुंबईची जागा एमआयएमसाठी सोडली, ओवेसी ठरवणार कोण उमेदवार असणार

परिवर्तनासाठी आता कार्यकर्ता सज्ज झाला आहे

. काहीतरी नवीन घडेल अशी अपेक्षा लोकांनी ठेवली होती, मात्र सगळ्यांची फसवणूक झाली.

मोदी आजही हात हलवत फिरतात.

नोट बंदीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला. : शरद पवार
नवी मुंबईत शरद पवारांची सभा सुरु
नवी मुंबईत शरद पवारांची सभा सुरु
नवी मुंबईत शरद पवारांची सभा सुरु
भाजपने 50 लोकांची नागपूर लोकसभा निवडणूक संचलन समिती घोषित केली. बावनकुळे क्लस्टर प्रमुख, सुधाकर देशमुख निवडणूक प्रमुख, राज्यमंत्री प्रवीण पोटे प्रभारी
परभणी : फर्निचर शोरुमला लागलेल्या आगीत मोठं नुकसान,
शोरुमसोबत दवाखाना, गॅरेज, टायर्सचे दुकान जळून खाक,
पाच जिल्ह्यांमधील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आयुक्त अजॉय मेहतांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी युनायटेड काँग्रेस अलायन्सचं आंदोलन, आयुक्त पुन्हा महापालिकेतून गायब.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आयुक्त अजॉय मेहतांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी युनायटेड काँग्रेस अलायन्सचं आंदोलन, आयुक्त पुन्हा महापालिकेतून गायब.
अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक संपली, जालन्याच्या जागेबाबत उद्या मुख्यंत्र्यांच्या उपस्थित औरंगाबादमधील बैठकीत निर्णय होणार
अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक संपली, जालन्याच्या जागेबाबत उद्या मुख्यंत्र्यांच्या उपस्थित औरंगाबादमधील बैठकीत निर्णय होणार
जालन्याच्या तिढ्यावर 'मातोश्रीवरील आजच्या बैठकीत अंतिम तोडगा नाही. आज उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्यात प्राथमिक चर्चा होणार आहे. उद्या शिवसेना-भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये होणार आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार आहे.
जालन्याच्या तिढ्यावर 'मातोश्रीवरील आजच्या बैठकीत अंतिम तोडगा नाही. आज उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्यात प्राथमिक चर्चा होणार आहे. उद्या शिवसेना-भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये होणार आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार आहे.
अकोला : प्रकाश आंबेडकर यांच्या कृषीनगर भागातील 'यशवंत भवन' या निवासस्थानासमोर एकाएकी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा येऊन उभा राहिल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काही वेळाने हा पोलिसांच्या 'मॉक ड्रील'चा भाग असल्याचं स्पष्ट झाल्यानं अफवांना पुर्णविराम मिळाला आहे.
मुंबई : जालना मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी हालचाली, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना मातोश्रीवर बोलावणं, दुपारी 12 वाजता अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार


पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संघर्षाची चर्चा... मात्र सुप्रिया सुळेंच्या पोस्टमुळे चर्चांना पूर्णविराम

पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संघर्षाची चर्चा... मात्र सुप्रिया सुळेंच्या पोस्टमुळे चर्चांना पूर्णविराम

#BREAKING नवी दिल्ली : नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय निवडणूक समितीची आज बैठक, लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करणार, 180 उमेदवारांची नावं जाहीर करण्याची शक्यता


जालना मतदारसंघातील तिढा सोडवण्याच्या हालचाली सुरु, उद्धव ठाकरेचं अर्जुन खोतकर यांना मातोश्रीवर बोलावणं, युतीच्या पहिल्या यादीवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता


मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर तिथला रस्ता आज 36 तासानंतर पुन्हा सुरु करण्यात आला आहे. काल रात्रभर काम करुन दुर्घटनाग्रस्त पूल पूर्णतः पाडण्यात आला. हे पाडकाम झाल्यानंतर आज सकाळपासून या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र सीएसएमटी स्टेशनमधून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी अजूनही जीव मुठीत घ्यावा लागत आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत हा पूल पुन्हा बांधण्यात येत नाही तोपर्यंत इथे वाहतूक पोलिस तैनात करावे लागतील.

Background

राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. सहा जणांचा जीव घेणारा सीएसएमटी पूल भुईसपाट, तर मुंबईतल्या इतर पुलांचीही दुरुस्ती करण्याची मागणी

2. सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर कारवाई, कंपनी काळ्या यादीत तर ठेकेदाराविरोधात गुन्हा, पालिका आयुक्तांच्या अटकेची मागणी

3. मुंबईकरांच्या आसवांपेक्षा उद्धव ठाकरेंसाठी प्रचार महत्त्वाचा, अमरावतीतल्या सभेत दुर्घटनेबद्दल चकार शब्दही नाही, सभेनंतर मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा सोपस्कार

4. बुलेट ट्रेन कशाला हवी? त्यापेक्षा लोकलसेवा सुधारा, सीएसएमटी पूल दुर्घटनेवरुन शरद पवारांचे सरकारवर ताशेरे

5. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर भाजपही लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार, संध्याकाळी संसदीय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय

6. निवडणुकांच्या तोंडावर पोलीस कारवायांना वेग, नागपूरच्या सावनेरमधून 80 लाखांची रोकड जप्त, नेत्रावती एक्स्प्रेसमधून 532 बाटल्या दारु हस्तगत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.