LIVE BLOG | लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीवर जाणार

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 06 Mar 2019 10:33 PM
प्रा. वामन केन्द्रे यांना एनएसडीचा ब.व.कारंथ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतिने दिला जाणारा ब.व.कारंथ स्मृति राष्ट्रीय रंग पुरस्कार हा यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रोख रूपये एक लाख,सम्मान चिन्ह,सन्मानपत्र,शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा आहे.
औरंगाबाद : उपसरपंचाने रॉकेल टाकून ग्रामपंचायत पेटवली. जिल्ह्यातील खोडेगाव ग्रामपंचायतील प्रकार, गावकारभारात विचारत नसल्याने पेटवली ग्रामपंचायत, ग्रामपंचायत पेटवून उपसरपंच फरार, पोलीस घटनास्थळी दाखल, संगणक आणि काही कागदपत्रे जळल्याची शक्यता. पूनम नागलोथ असं उपसरपंचाचे नाव
नागपूर : चिखलात रुतल्याने वाघिणीचा मृत्यू, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. 498 मध्ये बांद्रा तलाव क्र. 1 मध्ये एक प्रौढ वाघीण चिखलात रुतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आली
नागपूर : चिखलात रुतल्याने वाघिणीचा मृत्यू, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. 498 मध्ये बांद्रा तलाव क्र. 1 मध्ये एक प्रौढ वाघीण चिखलात रुतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आली
बुलडाणा : शहरात एका माकडाने आज चांगलाच उच्छाद मांडला, माकडाने 2 जणांना चावा घेतला, जिल्हा उद्योग कार्यालयाचा ताबा घेत या माकडाने चांगलाच धुमाकूळ घातला, रेस्क्यू टीमने जेव्हा त्या माकडाला बेशुद्ध करून ताब्यात घेतले
नाशिक : जिल्ह्यातील नामपूर बाजार समितीमधील कार्यालयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टाळे ठोकले,
बाजारसमिती कर्मचारी कार्यालयात अडकले
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा परिसरातील जंगलातून वाघीण जेरबंद, जेरबंद करण्यात आलेली वाघीण अंदाजे 2 वर्ष वयाची आहे.
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा परिसरातील जंगलातून वाघीण जेरबंद, जेरबंद करण्यात आलेली वाघीण अंदाजे 2 वर्ष वयाची आहे.
समुद्राच्या उधाणामुळे समुद्रालागतच्या शेतीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत,

एकूण शेतीचे 33 टक्के किंवा त्याहून जास्त नुकसान झाल्यास पुढील मदत मिळणार,

प्रति हेक्टर 6800 रुपये मिळणार
,
आश्वासित सिंचन असलेल्या क्षेत्राचे नुकसान झाल्यास 13,500 रुपये
,
बहुवार्षिक पीकांचे नुकसान झाल्यास 18,000 प्रति हेक्टर मदत मिळणार
,
यावर्षी समुद्राच्या उधाणामुळे 39,506 हेक्टर बाधित क्षेत्र शेतीचे झाले नुकसान
,
खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

तळेगाव दंगलप्रकरणी 10 जणांना नाशिक जिल्हा विशेष न्यायालयाने सुनावली 7 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा,
8 ऑक्टोबर 2016 रोजी एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कारानंतर दंगल उसळली होती
लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर येणार, यावेळी महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांसंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार
औरंगाबाद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या साधणार प्रमुखांशी संवाद. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार बूथ प्रमुखांशी संवाद, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला का राष्ट्रवादीला? हा तिढा कायम असताना उद्या बूथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे औरंगाबादची जागा राष्ट्रवादीकडे जात असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू
मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरण,
प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 12 मार्चपर्यंत तहकूब, तूर्तास मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला दिलासा कायम
राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली, पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी लोकसभेची तयारी केली होती, आता तयारी अंतिम टप्प्यात, निवडणूक लढवण्यावर ठाम, जालना मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा, खोतकरांची मागणी, जालन्याच्या जागेवर चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार, चर्चेतील निर्णय अंतिम, खोतकरांचं वक्तव्य
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्यात आलं. सीसीटीव्हीचे रिसिव्हर पळवण्यास विरोध केल्याने लुटारूंनी गोळीबार केला. पायाला गोळी लागल्याने दिव्यांग मेहता हा तरुण व्यापारी यात जखमी झाला आहे.
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची प्राप्तिकर विभागानं काल चौकशी केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. मात्र आता गोकुळनं ही चौकशी रुटिन असल्याचा खुलासा केला आहे. सहकारी दूध संघामध्ये लपून काहीच करता येत नसते. प्राप्तिकर विभागाला चौकशी करण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे ते आमच्यकडेही चौकशीला आले होते आणि आम्ही सुद्धा त्यांना माहिती दिली असं मत गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर दूध संघासाठी जे टँकर वापरले जातात याचा सुद्धा या चौकशीची संबंध नसल्याचं देखील सांगितलं आहे. व्यवहारामध्ये जरा टॅक्स कमी का भरला गेला असा त्यांना अधिकार आहे. त्याचबरोबर चौकशीसाठी अधिकारी आले होते त्यांना संघाची कागदपत्र आणि अर्थव्यवहार असणारी कागदपत्रे दाखवली असून आणखी काही कागदपत्रं हवी असतील तर त्यांना सहकार्य केलं जाणार असल्याचं दुध संघाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

मनसे आमदार शरद सोनावणे शिवसेनेत येण्याआधी 'मोतीश्री'वरचं राजकारण तापलं. शरद सोनावणे यांना विरोध करण्यासाठी जुन्नरच्या जिल्हा परिषद गटनेत्या
आशाताई बुचके मोताश्रीवर पोहोचल्या आहेत.
शरद सोनावणे यांना पक्षात घेण्याआधी शिवसैनिकांना विश्वासात घेतलं जाईल, असं आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशाताईंना दिलं.

आशाताई यांनी याआधी 2014 साली जुन्नर विधानसभा निवडणूक लढवली होती.
राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, संरक्षण मंत्रालयातून काही कागदपत्रं चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती
राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, संरक्षण मंत्रालयातून काही कागदपत्रं चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेचा वाद आपापसातील चर्चेने सोडविण्यास हिंदू महासभेसह अन्य हिंदू धर्मियांच्या वकिलांचा विरोध, कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी निगडित प्रश्न हा साधारण जमीनीच्या तंट्याप्रमाणे सोडवला जाऊ नये, ही हिंदू महासभेची भूमिका.. उत्तर प्रदेश सरकारकडूनही अशी मध्यस्थता किंवा सामोपचाराची चर्चा अव्यवहार्य असल्याची भूमिका.. मुस्लीम धर्मीयांच्या संघटना मात्र सहमतीने मध्यस्थीसाठी तयार.. सर्वोच्च न्यायालयात तब्बल 45 मिनिटे सुनावणी झाल्यानंतर निकाल राखून ठेवला.

अर्जुन खोतकर मातोश्रीवर दाखल झाले आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर आज अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. युती झाल्यानंतर खोतकरांनी रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना भेटून खोतकर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

युतीतील ईशान्य मुंबईच्या जागेचा पेच सुटण्याची शक्यता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या विभागप्रमुखांची बैठक बोलावली, मुंबईतल्या लोकसभेच्या जागेचा आढावा घेणार, ईशान्य मुंबईतील किरीट सोमय्यांना मदत करायची की नाही यासंदर्भात चर्चा होणार
सोलापुरातील विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा नामविस्तार करण्यास विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार, दुपारनंतर दुसऱ्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता, सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराला शिवा संघटनेचा विरोध
शिवसेना-भाजप युतीतील ईशान्य मुंबईच्या जागेचा पेच सुटण्याची शक्यता, मुंबईतल्या विभागप्रमुखांची पक्षप्रमुखांनी बोलावली बैठक, उद्धव ठाकरे मुंबईतल्या लोकसभेच्या जागेचा आढावा घेणार, ईशान्य मुंबईतील विभागप्रमुखांचा किरीट सौमय्या यांच्या उमेदवारीला विरोध आहे. ईशान्य मुंबईतील भाजप उमेदवार किरीट सौमय्यांना शिवसैनिकांनी मदत करायची की नाही यांसंदर्भात चर्चा अपेक्षित
सोलापूर : विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाला म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपला असं होत नाही : राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे
सोलापूर | शिवा संघटनेचे 7-8 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची उपस्थिती.. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार होणार.. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची कार्यक्रमाला दांडी
अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा अदलाबदली करत आघाडीत तोडगा निघण्याची शक्यता, काँग्रेसने औरंगाबादच्या बदल्यात नगरची जागा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिल्याची माहिती, राष्ट्रवादी औरंगाबादच्या जागेसाठी आग्रही, सुजय विखे पाटलांची राष्ट्रवादीत जाण्याची मानसिकता नाही

मुंबई | ईशान्य मुंबईतून आघाडीचा उमेदवार ठरला, राष्ट्रवादी जागा लढवणार, संजय दीना पाटील उमेदवार, ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांबरोबर शरद पवार व्हिडीओ कॉन्फरसिंद्वारे साधणार संवाद
अमेरिकेचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसा कालावधीत घट, पाच वर्षांऐवजी केवळ तीन महिन्यांचाच व्हिसा मिळणार
अमेरिकेचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसा कालावधीत घट, पाच वर्षांऐवजी केवळ तीन महिन्यांचाच व्हिसा मिळणार
वंचित बहुजन आघाडीमध्ये एका उमेदवारावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. हा वाद एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे पोहोचला. भारिप बहुजन महासंघाने जाहीर केलेला एक उमेदवार एमआयएमला मान्य नाही. जाहीर केलेला उमेदवार जिल्ह्यातीलच आणि एमआयएमचा असावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. उमेदवार बदलासंदर्भात ओवेसी आणि आंबेडकर यांनी मिळून निर्णय घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांची केली आहे.

मुंबई : खोतकर-फडणवीस भेटीनंतर आता रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. खोतकर-दानवे वाद मिटवण्यासाठी फडणवीस-ठाकरे मध्यस्थी करणार करत आहेत. कालच अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. युतीनंतर खोतकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटले होते. त्यानंतर सुभाष देशमुखांनी खोतकर-दानवेंची भेट घडवली होती. आता दानवे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
कोल्हापूर | गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड, चार तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी सुरु, आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी

Background

  1. सोलापुरातील विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाला म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपला असं होत नाही.. - भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांचं स्पष्टीकरण.. नामविस्तार कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडी

  2. निवडणुका डोक्यावर असताना निर्णयांचा सपाटा, शिक्षक-प्राध्यापकांना सातवा वेतन लागू, इतर 22 निर्णयांनाही मंजुरी

    2. 2011 पूर्वीचे गावठाण आणि सरकारी जमिनीवरची अतिक्रमित घरं नियमित करणार, ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय

    3. बारामती, माढा आणि नांदेडची जागा द्या, वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी, 22 जागांचाही आग्रह

    4. अजून घोषणा दिल्या तर तिकीटच कापेन, लॉबिंग करु पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा दम, माढ्यावरुन चंद्रकांत पाटलांनाही आव्हान

    5.  हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत संस्थांवर पाकिस्तानकडून बंदी, तर मसूद अजहरच्या भावासह 44 अतिरेक्यांना अटक

    6. टीम इंडियाचा नागपूर वन डेत ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी सनसनाटी विजय, कोहलीचं वन डेत चाळीसावं शतक, विजय शंकरची अष्टपैलू कमाल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.