LIVE BLOG | राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या मंचावर

सुजय विखे भाजपमध्ये आले होते, तेव्हाच मी राधाकृष्ण विखे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं होतं, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, विखेंचं शिवसेनेत स्वागतच आहे, त्यांनी पूर्वीही सेनेसाठी काम केल्याची राऊतांकडून आठवण

ABP News Bureau Last Updated: 26 Apr 2019 11:15 PM
अरुण गवळीच्या कुटुंबीयांचा महायुतीला पाठिंबा जाहीर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, भाजप आमदार प्रसाद लाड आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेतली अरुण गवळीच्या कुटुंबीयांची भेट
काँग्रेस सत्तेत आल्यास देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी बजेट सादर करणार, वर्षाच्या सुरुवातीलाच हमीभावाविषयी माहिती मिळणार : राहुल गांधी
प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील, अशा थापा मारुन नरेंद्र मोदींनी सत्ता मिळवली, सत्तेत आल्यावरही थापेबाजी सुरुच : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील सभेला मराठीतून सुरुवात, मुंबादेवी, सिद्धिविनायक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन मोदींची भाषणाला सुरुवात
शरद पवारांना राहुल गांधींसोबत एका व्यासपीठावर यायचं नव्हतं, म्हणून त्यांची एकही एकत्रित सभा झाली नाही, जे मनाने एकत्र येऊ शकत नाहीत, ते सरकार बनवायला काय एकत्र येणार? : उद्धव ठाकरे
कोल्हे लांडग्यांनी निवडणुकीसाठी पोपटाला बोलावलं, मात्र वाघ-सिंह एकत्र आले आहेत : देवेंद्र फडणवीस
अभिनेते वैभव मांगले सांगलीत नाटकाच्या प्रयोगादरम्यान चक्कर येऊन कोसळले
नाट्यगृहात एसी नसल्याने आणि वाढत्या तापमानामुळे त्रास झाला
उपचारासाठी मांगले खासगी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
अभिनेते वैभव मांगले सांगलीत नाटकाच्या प्रयोगादरम्यान चक्कर येऊन कोसळले
नाट्यगृहात एसी नसल्याने आणि वाढत्या तापमानामुळे त्रास झाला
उपचारासाठी मांगले खासगी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकायला, देशाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, मोदींच्या सभेला उपस्थित मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांची 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया
राधाकृष्ण विखे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती, शिवसेनेच्या प्रचारसभेला गेल्याने कारवाई
राधाकृष्ण विखे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती, शिवसेनेच्या प्रचारसभेला गेल्याने कारवाई
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या सभेसाठी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी हजर
सुजय विखे भाजपमध्ये आले होते, तेव्हाच मी राधाकृष्ण विखे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं होतं, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, विखेंचं शिवसेनेत स्वागतच आहे, त्यांनी पूर्वीही सेनेसाठी काम केल्याची राऊतांकडून आठवण
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या मंचावर, शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या होर्डिंगवर विखे, उघडपणे शिवसेनेचा प्रचार
आमचे सरकार आल्यावर आरे कॉलनीमधील मेट्रो कार डेपो दुसरीकडे हलवणार, काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच आश्वासन
उत्तर-मध्य मुंबईतील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ए. आर. अंजरिया पोलिसांच्या ताब्यात
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सकाळे झेंडे दाखवणार होते
- साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिल्याविरोधात आंदोलन करणार होते
सोलापूरात यंदाच्या मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद,
तापमानाचा पारा 44.3 अंशांवर,
पुढील 2 दिवस उष्णता कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत,
रुळ खराब झाल्याने लोकल एकाच जागी उभ्या
ठाण्यात महायुतीचे उमेदवार राजन विचारेंना विरोध करणाऱ्यांना वाघबीळ गावात पोलिसांचा धाक? राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप, सरकारकडून पोलिस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा दावा
भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्यवरील आग नियंत्रणात, आगीत लेफ्टनंट कमांडर डी एस चौहान यांचा मृत्यू
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडला आग, फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या रवाना
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडला आग, फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या रवाना
गुजरात : आसाराम बापूचा मुलगा नारायण साई बलात्काराच्या प्रकरणात दोषी, सुरत सत्र न्यायालयाचा निर्णय, 30 एप्रिल रोजी शिक्षेची सुनावणी
अहमदनगर : लोकनाट्य तमाशाच्या महिला कलाकारांवर हल्ला, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील घटना,
टाकळी लोणार गावात यात्रेनिमित्त शिवकन्या बडे यांच्या तमाशाचे केले होते आयोजन, यावेळी 8 ते 10 महिलांना केली मारहाण, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
अहमदनगर : लोकनाट्य तमाशाच्या महिला कलावंतांवर हल्ला, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील घटना, 8 ते 10 महिला कलावंतांना मारहाण
सीएसएमटी स्टेशनवर अपघात, ट्रेन बफरला धडकली, हार्बर मार्गावरीप ट्रेन प्लेटफॉर्म नंबर एकवर बफरला धडकली, वाहतुकीला मोठा फटका बसू शकतो, हार्बर मार्गावर गाड्या उशिराने धावत आहेत
सीएसएमटी स्टेशनवर अपघात, ट्रेन बफरला धडकली, हार्बर मार्गावरीप ट्रेन प्लेटफॉर्म नंबर एकवर बफरला धडकली, वाहतुकीला मोठा फटका बसू शकतो, हार्बर मार्गावर गाड्या उशिराने धावत आहेत
हिंगोली : उष्माघाताने मेढ्यांच्या बारा पिल्लांचा मृत्यू, वसमत तालुक्यातील सातेफळ येथील घटना, 70 ते 75 हजारांचं नुकसान
हिंगोली : उष्माघाताने मेढ्यांच्या बारा पिल्लांचा मृत्यू, वसमत तालुक्यातील सातेफळ येथील घटना, 70 ते 75 हजारांचं नुकसान
नालासोपारा : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सभेत आलेल्या हद्दपार गुंडावर गुन्हा दाखल. संजय बिहारी उर्फ संजय महंतो असे गुन्हा दाखल झालेल्या अट्टल गुन्हेगारांचे नाव आहे. निवडणुकीच्या काळात हा वसई तालुक्यातून हद्दपार होता. तरीही गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सभेत आला होता.
चंद्रपुर : चंद्रपूर तालुक्यातील लोहारा गावाशेजारी तलावात 2 मुलांचा बुडून मृत्यू, अंशु कोडापे आणि रितीक मेश्राम अशी मृतांची नावे

गोवा : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंचतर्फे माजी आरएसएस प्रमुख तथा गोवा सुरक्षा मंचचे पक्ष प्रमुख सुभाष वेलिंगकर लढवणार निवडणूक, उद्या भरणार उमेदवारी अर्ज
दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशीच परिस्थिती सोलापुरात पाहायला मिळत आहे. शहराला एकीकडे पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना महापालिकेशेजारीच पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी काम चालू आहे, त्याचवेळी अचानक पाईप फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेलं. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले असून पाईपलाईन दुरुस्त करण्यात येत आहे.
पाटना येथील सभेला जाताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, संगमनेरसह दिवसभरातील इतर सभांना उशीर होणार, राहुल गांधींचं ट्वीट
पाटना येथील सभेला जाताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, संगमनेरसह दिवसभरातील इतर सभांना उशीर होणार, राहुल गांधींचं ट्वीट
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील सहकारी आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर 10 कोटींच्या धानाची अफरातफर, जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 12 गोडाऊन केले सील

भंडारा : माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं, हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू, कुशारी गावातील घटना मच्छीमार संघटनेची अज्ञातांविरुद्ध मोहाडी पोलिसात तक्रार दाखल
भंडारा : माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं, हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू, कुशारी गावातील घटना मच्छीमार संघटनेची अज्ञातांविरुद्ध मोहाडी पोलिसात तक्रार दाखल
ज्येष्ठ अॅनिमेटर-दिग्दर्शक व्ही जी सामंत यांचं निधन, फिल्म डिव्हिजनची अनेक अॅनिमेशन त्यांनी केले. 'एकता का वृक्ष', 'हनुमान' हे त्यापैकीच एक
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो तब्बल अर्धा तास बंद ,
घाटकोपर स्थानकात तांत्रिक बिघाड

Background

1. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार शक्तिप्रदर्शन, भव्य रोड शो नंतर दशाश्वमेध घाटावर गंगाआरतीत सहभागी, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

2. अक्षय कुमारने विचारलेल्या आंब्याच्या प्रश्नावरुन राज ठाकरेंचा मोदींना टोला, सत्तेसाठी सेना लाचार झाल्याचाही पुनर्रुच्चार

3. विखे-पाटलांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला, संगमनेरमधील राहुल गांधींच्या सभेला विखे अनुपस्थित राहणार, उद्या अंतिम निर्णय

4. प्रचाराच्या रणधुमाळीत जगण्यामरण्याचे प्रश्न दुर्लक्षित, त्र्यंबकेश्वरमधील बर्ड्याच्यावाडीत हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा प्रवास

5. सरन्यायाधिशांविरोधातल्या षडयंत्राच्या दाव्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती ए के पटनायक करणार, सीबीआय, आयबी, दिल्ली पोलीसांना सहकार्याचे कोर्टाचे आदेश

6. चिमुकलीवर बलात्कार-हत्या प्रकरणातील नराधमाची फाशी हायकोर्टाकडून रद्द, कायदेशीर त्रुटींचा फायदा ,ठाणे सत्र न्यायालयाला पुन्हा खटला चालवण्याचे आदेश

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.