Loksabha Election 2019 LIVE BLOG : राज्यात पाच वाजेपर्यंत 57 टक्के तर देशभरात सहा वाजेपर्यंत 59.25 टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, कल्याण, मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, नंदुरबार, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

ABP News Bureau Last Updated: 29 Apr 2019 11:15 PM

Background

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान आज होणार आहे. या टप्प्यात राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा...More

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांनी मतदानानंतर प्रतिस्पर्धी अरविंद सावंत यांच्याशी फोनवर संवाद साधत आभार मानले, दक्षिण मुंबईचे खासदारपद भूषविल्याबद्दल अरविंद सावंत यांना शुभेच्छाही दिल्या, प्रचारादरम्यान सावंत यांच्या उत्साह आणि उत्स्फूर्तपणाला मिलिंद देवरांकडून दाद